सावद्यात वयोवृद्ध महिलेचा ट्रकच्या धडकेने मृत्यू
An elderly woman died after being hit By a Truck In Sawada सावदा : मॉर्निग वाक करणार्या सुमन तुकाराम काटे (70) या वयोवृद्ध महिलेला रविवार, 31 रोजी सकाळी 6.30 वाजे दरम्यान अज्ञात ट्रकने धडक दिल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायरा पेट्रोल पंपाच्या समोरच हा अपघात घडला.
अज्ञात ट्रकचा पोलिसांकडून शोध
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. नित्यनियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी सुमन तुकाराम काटे ( कोष्टी ) या रविवारी सकाळी सावदा-फैजपूर मार्गावर नायरा पेट्रोल पंपासमोरून जात असताना अज्ञात ट्रकने सुमन काटे यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारार्थ त्यांना हलवल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. तुकाराम देवराम काटे यांच्या पत्नी होत. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अंत्यसंस्कार भुसावळ येथे करण्यात आले. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परीवार आहे.

चाळीसगावात धूम स्टाईल विवाहितेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले : चोरटा जाळ्यात
