नापिकीला कंटाळून शेतकर्याने उचलले टोकाचे पाऊल : या गावातील धक्कादायक घटना
जळगाव : 65 वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी तालुक्यातील पाथरी या गावातील घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. सखाराम बुधा धनगर (65, रा.पाथरी, ता.जि.जळगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
नापिकीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा
सखाराम धनगर हे आपल्या पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. शेतातील सततची नापीकी आणि आजारपणामुळे ते विंवचनेत होते. सोमवार, 1 ऑगस्ट रोजी मुलगा, सुन व पत्नी हे सर्व शेतात कामासाठी निघून गेल्यानंतर सखारा धनगर हे घरात एकटेच होते. दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घरातील कुटुंब दुपारी घरी आले तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयता घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी बेबाबाई, मुलगा गोविंदा, सुन ज्योती, नातवंडे आणि दोन भाऊ असा परीवार आहे.

