बंद घर दिसताच चोरट्यांनी साधला डाव : या गावातील घटना
Thieves targeted a closed house in Chincholi: 16 thousand was stolen जळगाव : बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी 11 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि चांदीच्या मुर्त्या असा एकूण 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. जळगाव तालुक्यातील चिंचोलीत झालेल्या घरफोडी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
युवराज भीमराव पवार (40, चिंचोली, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून त्यांच्या घरात असलेले 11 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि पाच हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या मुर्त्या असा एकूण 16 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता समोर आली.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
याबाबत युवराज पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी 12.30 वाजता अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.
