विवाहितेला छळत परस्पर केले दुसरे लग्न : पाचोर्यातील चौघांविरोधात गुन्हा
Maximum of husband in Pachora : Second Marriage Committed While Wife : Crime Against Four पाचोरा : पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाचोर्यातील पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एक लाखांसाठी छळ
मोनाली अंकुश कटारे (रा.आदर्श नगर, पुनगाव रोड, पाचोरा) यांचा विवाह येथील अंकुश भगवान कटारे यांचेशी झाला आहे. दरम्यान त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा देखील आहे. दरम्यान अंकुश कटारे यांनी पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले. घर दुरुस्तीसाठी हिचा माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून मोनालीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
सततच्या होणार्या त्रासाला कंटाळून तसेच पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केल्याने मोनाली अंकुश कटारे हिच्या फिर्यादीवरून पती अंकुश भगवान कटारे, मेघना प्रविण मानकरी, रामकृष्ण दामू सोनवणे व अनुराधा रामकृष्ण सोनवणे (सर्व रा.पाचोरा) यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.
