जळगावात दुकलीने महिलेला घातला 20 हजारांचा गंडा : बोलण्यात गुंतवून दागिने लांबवले
In Jalgaon, Dukli put a 20,000 ganda on a woman: He engaged in talking and gave away the jewelry जळगाव : सोन्याचे दागिणे पर्समध्ये टाकण्याचे बहाणे करीत दुकलीने जळगावच्या महिलेला 20 हजारांचा गंडा घातला. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. बुधवारी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुकलीचा पासेलिसांकडून शोध
सारीका गणेश सनसे ही 46 वर्षीय महिला (रा. कुंभारवाडा, मारुती मंदिराजवळ, अमरधामरोड, जुने नाशिक) आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी त्या जळगावात आल्या होत्या. दुपारी 2 वाजता आठवले हॉस्पिटलजवळ उभे असताना त्यांच्याजवळ दोन तरुण आले. त्यांनी सांगितले की ‘तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवून घ्या, नाहीतर कोणीतरी चोरून घेऊन जाईल’. त्यानुसार सारिका सनसे यांनी त्या तरुणांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जवळ असलेले सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवत असताना दोन जणांनी त्यांना बोलण्यात गुंतवले व त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल गणेश निकम करीत आहेत.

