खिर्डीच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर केला बलात्कार
जळगाव : रावेर तालुक्यातील खिर्डी येथील तरुणाने जळगावच्या तरुणीवर लग्न आमिषाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीची पोलिसात धाव
जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख चंदन मोतीराम चौधरी (रा.खिर्डी, ता.रावेर) याच्याशी झाली. दरम्यान त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पीडीतीने बुधवार, १० ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. तक्रारीवरून संशयित आरोपी चंदन मोतीराम चौधरी (खिर्डी, ता.रावेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.

