भुसावळात मारहाण करीत 35 हजार रुपये लुटले


भुसावळ : हॉटेलवरून जेवण करून घराकडे येत असलेल्या दोघांना अडवत दोघा आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिश्यातील 35 हजारांच्या रोकडसह मोबाईल हिसकावून घेण्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील यावल नाक्याजवळील काकाजी ढाब्याजवळ घडली. याप्रकरणी दोन जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यावल नाक्याजवळील काकाजी ढाब्यावर जेवण केल्यानंतर पिंटू सुरेश रायपूत (रा.भारत नगर, भुसावळ) व त्याचा मित्र रघू तायडे यांना सुनील लोखंडे आणि मनोज लोखंडे यांनी दोन्ही जणांना मारहाण केली, यात लोखंडी पाईप व फावडे डोक्यात मारल्याने पिंटू राजपूत व तायडे जखमी झाले. यावेळी त्यांच्या खिश्यातील 35 हजारांच्या रोकडसह एक हजार 600 रुपये किंमतीचा मोबाईल दोघा आरोपींनी काढला. जखमी अवस्थेत दोघांनी रविवारी रात्री शहर पोलिस ठाणे गाठून झालेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दोन्ही जखमींना मेडीकल मेमो देत जळगाव येथे उपचारार्थ पाठविले. उपचार करून सोमवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात आल्यावर पिंटू रायपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील व मनोज लोखंडेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी या प्रकरणी चौकशी केली. पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी पुढील तपास करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !