जळगाव एसीबीचे एएसआय सुरेश पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
ASI Suresh Patil of Jalgaon ACB announced President’s Police Medal जळगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलिस दलातील पाच कर्मचार्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एएसआय सुरेश पंडित पाटील यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी सुरेश पाटील यांचे बुके देवून स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.
यांना जाहीर झाले पदक
जळगाव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, सहाय्यक निरीक्षक विजय देवराम पाटील, हवालदार सुरेश देवराज पाटील, सहाय्यक फौजदार प्रदीप चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

