भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : कुविख्यात आरोपी जाळ्यात
भुसावळ- शहरातील बसस्थानकाच्या परीसरात सार्वजनिक जागी हातात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी अजय ( ऊर्फ ) सोनु मोहन अवसरमल यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. संशयीत आरोपी अजय अवसरमल याच्या विरुध्द भुसावळ बाजारपेठ, शहर, मुक्ताईनगर, लोहमार्ग आदी पोलिस ठाण्यात जबरी चोरी, आर्म अॅक्ट नुसार यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. भुसावळ शहरात बस स्थानक बाजुच्या रोडवर सार्वजनिक जागी एक इसम हा हातात धारधार तलवार घेवून दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने डीवायएसपी गजानन राठोड , बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनााली बाजारपेठ पोलिस रविंद्र बिर्हाडे, पो.कॉ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे जावून त्यास ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत अजय (ऊर्फ) सोनु मोहन अवसरमल (वय 22, रा.राममंदिर चिंचाल, लालबाग, बर्हाणपुर, मध्यप्रदेश ह.मु.भारत नगर, भुसावळ) असे नाव असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी अजयजवळून पोलिसांनी एक लोखंडी तलवार जप्त केली. त्याच्याविरुध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
