Wife killed for refusing to brush her teeth : Incident in Shirpur Taluka दात घासण्यास तपकिर न दिल्याने पत्नीची हत्या : शिरपूर तालुक्यातील घटना

आरोपीला पतीला शिरपूर तालुका पोलिसांनी केली अटक : जागीच झाली महिलेचा मृत्यू


Wife killed for refusing to brush her teeth : Incident in Shirpur Taluka शिरपूर : दात घासण्यासाठी तपकीर मागितल्यानंतर पत्नीने ती न दिल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाड मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथे गुरुवारी रात्री घडली. गीता रामलाल पावरा (45) असे मृत महिलेचे आहे. रामलाल हजार्‍या पवार (50) असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.

परीसरात उडाली खळबळ
ही घटना कळताच परीसरातील नातेवाईकांनी शिरपूर उपरुग्णालयात गीताबाई पावरा हिला दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आली. रामलाल हजार्‍या पावरा (50) या आरोपीस शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. मयत विवाहितेचे पिता मुलसिंग आवा पावरा (60, उमर्दा, ता.शिरपूर) यांनी या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून रामलाल पावरा याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !