Three employees of Yaval forest department suspended अवैध वृक्षतोड भोवली : यावल वनविभागाचे तीन कर्मचारी निलंबित


Three employees of Yaval forest department suspended यावल : प्रादेशिक वनविभाग पश्चिम क्षेत्रातील वाघझिरा वनक्षेत्रात गेल्या पंधरवाड्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड झाली व या वृक्षतोडीला थांबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत वनपाल, वनरक्षक व वनमजुरास निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना आपापल्या कार्यक्षेत्राची जवाबदारी वाढली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
यावल प्रादेशिक वनविभाग पश्चिम क्षेत्रात वाघझिरा परीमंडळ आहे या परिमंडळात वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी.वाय.नलावडे व वनमजूर काशीनाथ बेलदार हे तिघे कार्यरत होते. त्यांच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन महिन्यात सातपुड्यात अवैधरीतत्या वृक्षतोड झाली व ही वृक्ष तोड थांबवण्यास त्यांना अपयश आल्याने तिघांना वरी1ष्ठांनी थेट निलंबीत केल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राची वनपरीक्षेत्रपाल एस.टी.भिलावे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !