aghori-puja-for-getting-a-son-wife-made-to-take-bath-in-front-of-everyone पूत्रप्राप्तीसाठी धक्कादायक प्रकार : व्यापार्‍याने मांत्रिकासह सर्वांसमोर पत्नीस करायला लावली अंघोळ

पीडिता पुण्यातील : पैशासाठीही मारहाण, पती, सासू-सासर्‍यासह मांत्रिकावर गुन्हा दाखल


Shocking way to get a son: Merchant makes his wife take bath in front of everyone including the sorcerer पुणे : मुलगा होण्याच्या हट्टापायी पुण्यातील व्यापार्‍याने पत्नीला मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याचा धक्काप्रकार प्रकार उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जादूटोणा आणि नरबळी कायद्यांंतर्गत पती शिवराज कोरटकर (36), सासरा राजेंद्र कोरटकर (64), सासू चित्ररेखा कोरटकर (62, सर्व रा. पुणे), मांत्रिक मौलाना बाबा जामदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 3 मे 2022 ते 22 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला.

मारहाण करीत केला छळ
पीडितेचा शिवराज कोरटकरशी विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस दोघे चांगले नांदले मात्र काही दिवसानंतर पैशांसाठी पीडितेचा छळ सुरू झाला. तिला मारहाण केली जात होती. शिवराजने लग्नात मिळालेले दागिनेही परस्पर विकले. त्याने पीडितेच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्रेही परस्पर बँकेत देऊन त्यावर खोटी सही करून तब्बल 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले.

छळ असह्य झाल्याने नोंदवली तक्रार
घरात सुख-शांतता नांदावी तसेच मुलगा व्हावा यासाठी शिवराजने मांत्रिकाला घरात बोलावले. त्याच्या सांगण्यावरून पीडितेला रायगड येथे नेले आणि मुलगा व्हावा यासाठी सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. यानंतरही पीडितेला वारंवार मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने पीडितेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !