A Banana Trader Was Assaulted By Unknown Persons In A Hotel In Sawada सावद्यात केळी व्यापार्यास हॉटेलमध्ये अज्ञाताकडून मारहाण
A Banana Trader Was Assaulted By Unknown Persons In A Hotel In Sawada सावदा : शहरातील हॉटेल साई प्रसादमध्ये अज्ञाताने केळी व्यापार्यास मारहाण केल्याची घटना 21 रोजी रात्री पावणेदहा वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
शहरातील हॉटेल साई प्रसादमध्ये रवी जानराव पाटील (चिखली, ता.मुक्ताईनगर, ह.मु.सावदा, ता.रावेर) हे बसले असता अज्ञाताने दारू पिवून शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पाटील यांनी सावदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अन्वर तडवी करीत आहेत.



