आचारसंहिता भंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईसाठी उपोषण


रावेर : आचारसंहिता भंग केलेल्या शासकीय कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी आशा सेवा संघटना अध्यक्ष चांगो भालेराव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्या कर्मचार्‍यानी आचारसंहिता भंग केली असून त्यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी भालेराव यांनी रावेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. रात्री उशीरा तहसीलदार उषाराणी देवगुणे व नायब तहसीलदार संजय तायडे, राष्ट्रवादी किसानसभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चांगो भालेराव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु भालेराव आपल्या मागण्या व उपोषणावर ठाम असून कार्यवाहीची मागणी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !