A seven-year-old girl was molested in Jalgaon Khurd Talathi office जळगाव खुर्द तलाठी कार्यालयात सात वर्षीय बालिकेचा विनयभंग


A seven-year-old girl was molested in Jalgaon Khurd Talathi office नशिराबाद : आजीसोबत तलाठी कार्यालयात आलेल्या सात वर्षीय बालिकेचा विनयभंग करण्यात आला. जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात ही घटना 10 जून 2022 रोजी पावणेतीन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी जळगाव खुर्द तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (नाव, गाव पूर्ण माहित नाही) विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आजी पाण्यासाठी बाहेर पडताच विनयभंग
10 जून 2022 रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास सात वर्षीय पीडीता आजीसह तलाठी कार्यालय, जळगाव खुर्द, ता. जळगाव येथे कामानिमित्त आल्या असता तेथे संशयीत आरोपी शिपाई भैय्या व एक इसम बसलेले होते. फिर्यादीने कार्यालयात बसलेल्यांना तलाठी मॅडम आहे का? याबाबत विचारपूस केली असता, शिपाई भैय्या याने तलाठी मॅडम आताच बाहेर गेल्याचे सांगितले. फिर्यादी व तीची नात उन्हात पायी आल्याने नातीने पिण्याचे पाणी मागितले. यानंतर फिर्यादीने नातीला तलाठी ऑफिस मध्येच बसवुन बाहेर असलेल्या नळावरुन पाणी घेण्यास गेली.

 

फिर्यादी बाटलीमध्ये पाणी भरत असतांना सात वर्षीय पीडीता असलेली नात ऑफिसमधून रडत बाहेर आली व तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आजीने नशिराबाद पोलिस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पूर्ण नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !