Pimprala railway gate finally closed : Tunnel option for motorists पिंप्राळा रेल्वे गेट अखेर बंद : वाहनधारकांना बोगद्याचा पर्याय


Pimprala railway gate finally closed : Tunnel option for motorists जळगाव : तब्बल 60 वर्षांपासून अधिक काळापासून भोईटेनगर, प्रेमनगरवासीयांसह परीसरातील नागरीकांना पलिकडे जाण्या-येण्यासाठी सोयीचे असलेले पिंप्राळा रेल्वे गेट सोमवारपासून बंद करण्यात आले आहेत तर दुसरीकडे वाहनधारकांना आता बोगद्यातून वाहतुकीचा पर्यय आहे. दरम्यान, यानुसार जळगावातील आसोदा व पिंप्राळा रेल्वे गेटलगत उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या नुसार 1960 पासून सुरू असलेले पिंप्राळा रेल्वे गेट सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

तोपर्यंत धूळ व आवाजापासून मुक्ती
पिंप्राळा रेल्वे गेट सुरू होते तेव्हा मालधक्यावरील संपूर्ण वाहतूक ही रींग रोडवरून होत होती. ही वाहतूक जड वाहनांची असल्याने रींग रोडवासीयांना आता जोपर्यंत या गेटवरील उड्डाणपूल तयार होत नाही, तोपर्यंत धूळ व आवाजाच्या प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आता मालधक्क्यावरील मालाची वाहतूक निमखेडीकडे जाणार्‍या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडून गुजराल पेट्रोल पंपाकडे होणार आहे.

बजरंग बोगद्याचा पर्याय
गाड्यांसह मालवाहतुकीच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवसभरात हे रेल्वे गेट 60 वेळा बंद राहत होते. त्यामुळे या गेटवर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असे. मात्र, हा उड्डाणपूल तयार झाल्यावर रेल्वेमुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. तोपर्यंत पिंप्राळा, भोईटेनरगर व प्रेमनगरातील नागरीकांना बजरंग बोगदा व शिवाजीनगर उड्डाण पुलाचा पर्याय उपलब्ध आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !