जळगावात गस्तीवर पोलिसांशी धक्काबुक्की : संशयीताला अटक


Clash With Police on Patrol in Jalgaon : Suspect Arrested जळगाव : शहरातील नेहरू पुतळाजवळ आस्थापना बंद करण्यासाठी कर्तव्यावर निघालेल्या पोलिस पथकावर हल्ला करून शिविगाळ व पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता एका तरुणाविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे, बापू मोरे, चालक अय्युब खान असे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री 10.30 वाजता शासकीय वाहन घेवून आस्थापना बंद करण्यासाठी निघाले होते. पद्मालय विश्राम गृहाजवळ रस्ता अडवून उभे असलेल्या तरुणांना पोलिसांनी हटकले. बियरबारच्या बाहेर रस्त्याच्या मधोमध दुचाकी एम.एच.19 डी.एच.5577 आडवी लावून सोबत असलेले आठ- दहा तरुण उभे होते. त्यापैकी यामावरील राजेंद्र भगवान पाटील (38, रा.मारोतीपेठ नेरीनाका, जळगाव) याने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिस कर्मचारी बापू मोरे व प्रफुल्ल धांडे यांच्या अंगावर धावून जात झोंबाझोबी करत धक्काबुक्की केल्याने पेालिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

आरोपीला पोलिसांकडून अटक
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय निकुंभ यांनी दिलेल्या फिर्यादीवन राजेंद्र पाटील याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !