Atrocity case against 11 people including district head of Shinde Group in Pachora Taluka !  महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास रोखले : पाचोरा तालुक्यातील शिंदे गटातील जिल्हाप्रमुखसह 11 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा !


Atrocity case against 11 people including district head of Shinde Group in Pachora Taluka ! पाचोरा : तालुक्यातील निपाणे येथे सोमवारी रात्री महिलेच्या मृतदेहावर जिल्हा परीषद स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करण्यात आल्याची संतापजनक 12 रोजी रात्री 11.30 वाजता घटना घडली. या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह 11 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातीवाचक शिविगाळ करीत अंत्यसंस्कार करण्यास रोखले
निपाणे येथील समाधान वामन धनुर्धर यांच्या आई निलाबाई धनुर्धर यांचे 11 रोजी सुरत येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह सोमवार, 12 रोजी निपाणे येथे आणण्यात आला व रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जि.प.च्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत मृतदेह आणण्यात आला. यावेळी मृतदेहाला अग्निडाग देण्याची तयारी होत असतानाच संशयीत आरोपींनी अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करीत जातीवाचक शिविगाळ केली. त्यामुळे धनुर्धर व त्यांच्या नातेवाईकांनी आईच्या मृतदेहावर स्मशानभूमीपासून काही अंतरावर रात्री 12.30 वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर पाचोरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
समाधान वामन धनुर्धर यांच्या फिर्यादीनुसार मनोहर गिरधर पाटील, रोशन धनराज पाटील, राजेंद्र विश्राम पाटील, त्र्यंबक हिलाल पाटील, मयूर राजेंद्र पाटील, गोकुळ सुरेश पाटील, निलेश नथ्थू पाटील, शांताराम राजधर पाटील, भैय्या बाळू पाटील, अजबराव ज्ञानेश्वर पाटील, वैभव राजेंद्र पाटील यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !