‘बेताल वक्तव्याचा निषेध : निरीक्षक बकालेंची बडतर्फी न केल्यास राज्यस्तरीय आंदोलन
यावल तालुका मराठा समाज आक्रमक : पोलिस व तहसील प्रशासनास निवेदन
‘Protest of baseless statement: State level agitation if inspectors are not dismissed यावल : जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध अश्लील भाषेत संभाषण समस्त मराठा समाजाची मानहानी केल्याने तालुक्यातील मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसीलदार महेश पवार व पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांना बकाले यांना बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. बकाले यांच्यावर बडतर्फीची कारवाई न केल्यास समाजाच्या वतीने राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
भर पावसात निघाला मोर्चा
यावल तालुका मराठा समाजाच्या वतीने भुसावळ रस्त्यावरील तहसीलदार कार्यालय व पोलिस स्टेशनपर्यंत भर पावसात शेकडोंच्या संख्येने मोर्चा नेत तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, जि.प.चे माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात किनगावचे विजयकुमार देवचंद पाटील, दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील, देवकांत पाटील, वसंत पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.संजय कदम, छाया अतुल पाटील, वर्षा अजय पाटील, मनीषा अनिल गावडे, डी.सी.पाटील, अॅड.डी.आर.बाविस्कर, दिनकर क्षीरसागर, सुनील गावडे, दत्तात्रय पाटील, डी.जे.पाटील, गणेश महाजन, ए.एन.यादव, एम.ए.पाटील, किरण शिंदे, बापू जासूद, तुषार येवले, दिलीप इंगळे, विलास येवले, हेमंत येवले, प्रा.मुकेश येवले, एकनाथ शितोळे, समाधान पाटील, दौलत मराठे, यशवंत जासूद, रवींद्र टोंगळे, यशवंत भोईटे, निलेश पवार, प्रकाश पवार, भूषण पवार, अशोक पाटील, शैलेश पवार, पप्पू पाटील, विजय यादव, गोपाल जासूद, विजय पाटील, समीर पवार, सुनील येवले, महेश पाटील, प्रवीण पाटील, अमोल खैरनार, एन.पी.चव्हाण, योगेश चव्हाण, अनिल सोनवणे, अक्षीत जासूद , संजय पाटील, राकेश शिर्के, विलास पवार, नरेंद्र पाटील, गणेश येवले, गोकुळ भोईटे व समाजबांधव उपस्थित होते.
