वरणगावात गुरांसाठी 800 लंपी प्रतिबंधक लस उपलब्ध
भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश : घरोघरी जावून गुरांना लसीकरण
वरणगाव : शहरात लंपी आजाराने थैमान घातल्यानंतरही गुरांच्या दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने शेतकर्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याकडे तक्रार केली होती. काळे यांनी याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीशमहाजन यांच्या कानावर ही बाब टाकल्यानंतर 800 लसींचा साठा उपलब्ध झाल्याने गुरांवर लसीकरणास सुरूवात करण्यात आली आहे.
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
शेतकरी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.दर्शना उभडे यांच्याकडे गेल्यानंतर लस नसल्याचे उत्तर मिळत असल्याने शेतकरी हरचंद धनगर, भगवान कुसुंबे, बाळा धनगर, सुनील वंजारी, पवन माळी, अंकुश माळी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची भेट घेत घडला प्रकार कथन केल1ा. त्यानंतर सुनील काळे, सुनील माळी, अरुण बावणे, ऋषिकेश महाजन, मयूर शेळके यांनी पशूवैद्यकीय दवाखान्यात जावून वस्तूस्थिती समजूत घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी पशू अधिकार्यांना आदेश दिल्यानंतर 800 लस उपलब्ध करून देण्यात आल्या. गुरुवारी पशू वैद्यकीय अधिकारी दर्शना उभाडे, कोल्हे, एकनाथ मराठे व इतरांनी शेतकर्यांच्या गोठ्यात जाऊन गाई, बैलांना लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू केले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या मोफत लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, किसान मोर्चाचे जिल्हा चिटणीस अरुण बावणे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश महाजन, मयूर शेळके, सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, बळीराम सोनवणे, अॅड.ए.जी.जंजाळे, भाजपा शहराध्यक्ष आकाश निमकर, मिलिंद भैसे, रमेश पालवे, भाजपा सरचिटणीस योगेश माळी, लखन माळी, सागर पवार, मयूर शेलके, कमलाकर मराठे आदींची उपस्थिती होती.
