Murder of woman in Bhusawal : Face Will Be Drawn Using Skull For Identification भुसावळात महिलेचा खून : ओळख पटवण्यासाठी कवटीचा वापर करून चेहरा रेखाटणार
Murder of woman in Bhusawal : Face Will Be Drawn Using Skull For Identification भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ 30 ते 35 वर्षीय वयोगटातील व निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह
बुधवार, 14 सप्टेंबर रोजी आढळला होता. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही मात्र े शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा प्रीझर्व्ह ठेवण्यात आला आहे. या महिलेवर अत्याचार झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली तर महिलेची ओळख पटण्यासाठी कवटीचा वापर करून चेहरा रेखाटण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कवटी वापराद्वारे रेखाटणार चित्र
मृत महिलेची कवटी मुंबईला पाठवून आधूनिक तंत्रज्ञानाद्वारे चेहरा रेखाटणार येणार असून त्यानंतर या महिलेची ओळख पटण्यास मदत होणार आहे. मयत महिला नेमकी कुठली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही शिवाय तिची ओळखदेखील पटलेली नसल्याने मिसिंग महिलांच्या चेहर्याशी महिलेची पडताळणीदेखील करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी करीत आहेत.

