सरपंचांसह ग्रामसेवकांनी केला वराड ग्रा.पं.त 26 लाखांचा अपहार : दोघांविरोधात गुन्हा
Village sevaks along with sarpanches embezzled 26 lakhs from Varad Grampanchayat : Crime against both जळगाव : जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीत विकासकामासाठी मंजूर रक्कम काढण्यात आल्यानंतर तसेच बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे असल्याचे चौकशीत दाखवून 26 लाख 36 हजार 300 रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आल्यानंतर
केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
सरपंचासह ग्रामसेवकांवर अपहाराचा ठपका
जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक बबन राजु वाघ आणि सरपंच उखा किसन मोरे यांच्याविरोधात 420, 467, 468, 471, 406, 409, 120(4). 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पद्माकर बुधा अहिरे पंचायत समिती जळगाव येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. वेळोवेळी झालेली चौकशी, त्यांचे अहवाल, ग्रामस्थांच्या तक्रारी, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा आदींच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल झाला.

