जळगावच्या विठ्ठल पेठमध्ये धाडसी चोरी : सोन्याच्या दागिण्यांसह 74 हजारांचा ऐवज चोरीला
Bold theft in Jalgaon’s Vitthal Peth: 74,000 worth of gold jewelery stolen जळगाव : बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर असून विठ्ठल पेठेतील बंद घराल टार्गेट करीत रोकडसह सोन्याचे दागिने मिळून 73 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी सहा वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
नाशिक येथील आय.टी.कंपनीत नोकरीस असलेले हरीष गोपाळ नेमाडे हे शहरातील जुन्या जळगावातील विठ्ठलपेठेत राहतात. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते विठ्ठल पेठेतील घराला कुलूप लावून नाशिक येथे कुटुंबियांसह स्थायीक झाले आहे. त्याच्या घराच्या कंपाऊंटमध्ये गणपतीचे मंदिर असल्याने ते अधून -मधून कुटुंबियांसह येत असतात. 13 रोजी सकाळच्या सुमारास हरिष नेमाडे यांना अनुप पाठक यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गंज तुटलेले असल्याची माहिती दिली. त्यानुसार शेजारी राहणार्या नगारीकांनी घरात जावून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

शनीपेठ पोलिसात गुन्हा
चोरट्यांनी घरातील बेडरुमधील दोन्ही लोखंडी कपाट टॉमीने तोडून त्यातील सोन्याची अंगठी, लेडीज चैन, रोख रक्कम, गॅस सिलेंडर असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.
