Big Relief : Girna Dam is 100 Percent Full For The Fourth time In a Row मोठा दिलासा : सलग चौथ्यांदा शंभर टक्के भरले गिरणा धरण


Big Relief : Girna Dam is 100 Percent Full For The Fourth time In a Row जळगाव : गिरणा धरण सलग चौथ्या वर्षीदेखील शंभर टक्के भरल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात 53 वर्षात हे धरण केवळ 12 वेळा 100 टक्के भरले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती.

गिरणा धरणाची माहिती
1955 मध्ये गिरणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सलग 14 वर्ष काम झाल्यानंतर 1969 मध्ये या धरणाचे लोकार्पण करण्यात आले. 1973 मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले. 53 वर्षात गिरणा धरण केवळ 12 वेळा 100 टक्के भरले आहे.
या प्रकल्पासाठी 13 कोटी रुपयांचा खर्च आला.

या वर्षांमध्ये धरण भरले 100 टक्के
1973 मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर 1976 मध्ये पहिल्यांदाच 100 टक्के भरले होते. त्यानंतर 1980, 1994, 2004 ते 2007 सलग 100 टक्के भरले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !