घरगुती गॅसचा खाजगी वाहनांमध्ये वापर : वाल्मिक नगर भागात कारवाई
जळगाव : वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या संशयिताला शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी अटक केली.
शहरातील वाल्मिक नगर भागात ही कारवाई करण्यात आली.
शनीपेठ पोलिसात गुन्हा
आरोपीकडे गॅस भरण्याची मोटार तसेच सिलेंडर तसेच इलेक्ट्रीक काटा असे १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गोपनीय माहितीवरून कारवाई
वाल्मिक नगर परीसरातील एका घरासमोर ताडपत्रीच्या छताखाली शुभम राजू बोरसे (२५) हा तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाला. त्यानुसार शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी ४५ हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार, २ हजार रुपयांचा इलेक्ट्रीक काटा व सिलेंडर असा एकूण १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच संशयित शुभम बोरसे यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

