पर्यटकांची बस दरीत कोसळून सात पर्यटक ठार


Seven tourists were killed when a tourist bus fell into a valley in Himachal कुल्लू : हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात पर्यटकांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात पर्यटक ठार झाले तर 10 जण जखमी झाले. औट-लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात
रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडला. खराब हवामान व अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या.

पाच तरुणांसह दोन मुली ठार
कुल्लूमधील बंजार व्हॅलीच्या घियागी भागात नॅशनल हायवे 305 वर टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडल्याने हा भीषण झाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक बचावासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र खराब हवामान आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठी अडचण आली. या बचावकार्याला सुमारे दोन तास लागले. अपघातात जखमी झालेल्या 10 लोकांपैकी 5 जणांना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 11.35 वाजता मदत आणि बचाव कार्य संपले. मृतांमध्ये 5 तरुण आणि 2 मुलींचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये तीन आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी आहेत.


कॉपी करू नका.