Death Of A Young Farmer In Sakegaon साकेगावातील तरुण शेतकर्याचा मृत्यू
Death Of A Young Farmer In Sakegaon भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी व शेतकरी कैलास काळू जमरे (25, रा.साकेगाव, मूळ रा.पिंपरीखेडा, ता.बडवाई, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांचा सोमवार, 26 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे स्पष्ट कारण कळू शकले नसलेतरी हृदयविकाराने हा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कैलास जमरे यांची प्रकृती सोमवारी खालावल्यानंतर त्यांना स्थानिक ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


