मनवेल गावातील तरूणाची गळफास घेत आत्महत्या


Manvel village youth committed suicide by hanging himself यावल : तालुक्यातील मनवेल गावातील २१ तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुटुंबीयाच्या निर्दशनास येताचं त्याचा मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला व यावल पोलिसात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयदीप गुलाब पाटील (21) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मनवेल, ता.यावल येथील रहिवासी जयदीप गुलाब पाटील (२१) हा तरूण बुधवारी घरी एकटा होता. आई, वडील व भाऊ हे शेतात कामाला गेले असतानान दुपारी या तरूणाने आपल्या राहत्या घराच्या छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली व मयत तरूणाचा मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदना करीता आणण्यात आला. यावल पोलिसात दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गौरव कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मयत तरूण हा अविविवाहीत होता व मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने आत्महत्या का केली? हे कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !