यावल शहरात इलेक्ट्रिकल दुकानाचे गोदाम फोडून साहित्य लांबवले


यावल : शहरातील इलेक्ट्रिकल दुकानाचे गोडावून फोडून इलेक्ट्रिकल सामानाची चोरी केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. शहरात फैजपूर रस्त्यावर आशीर्वाद इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान असून या दुकानाच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यात आले आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद
व्यावसायीक किरण सुधाकर भंगाळे यांनी गोदाम बंद केल्याने चोरट्यांनी संधी साधली. रविवारी सकाळी भंगाळे यांचे भाऊ शैलेश भंगाळे हे गोदामात गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लखात आले. चोरट्यांनी गोदामातून तीन हजार रुपये किंमतीचे टेपलींग कंपनीचे राऊटर, तीन हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर, पाचशे रुपये किंमतीचा सेटटप बॉक्स असा एकूण साडेसहा हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला तसेच काही जुने साहित्य देखील अज्ञात चोरट्यांनी लांबवले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !