यावल शहरातील 19 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या
A 19-year-old youth committed suicide by hanging himself in Yawal City यावल : शहरातील सुतार वाडा भागातील रहिवासी 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. विक्की उर्फ विनय युवराज कोळी (19) असे मयत तरुणाचे नाव आहे.
तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट
यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत सुतार वाडा भागातील विक्की उर्फ विनय युवराज कोळी या तरुणाने मंगळवारी त्याचे आई, वडील शेती कामासाठी बाहेर गेल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार शेजारील रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरीता यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. तरुणाने आत्महत्या का केली ? हे कळू शकले नाही. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, विवाहित बहिण असा परीवार आहे.

