भुसावळातील बसस्थानक परीसराने टाकली कात

नाना पाटील यांचा पुढाकार : प्रवाशांनी व्यक्त केले समाधान


Bus station in Bhusawal is surrounded by the area भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती व पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेच्या पंधरवड्याचे औचित्य साधून बसस्थानक परीसराची स्वच्छता नगरपरीषदेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनी केली. यावेळी बसस्थानक परीसरात झाडे लावण्यासाठी खड्डेदेखील तयार करण्यात आली. या कामासाठी साईभक्त व माजी नगरसेवक निर्मल (पिंटू ) कोठारी यांनी जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले.

प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
आगार प्रमुख प्रमोद चौधरी, वाहतूक नियंत्रक पी.बी.भोई यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक परीसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्रवाशांनी व परीसरातील नागरीकांनीही समाधान व्यक्त केले. बसस्थानकाचा परीसर लोकसहभागातून हिरवागार व स्वच्छ करण्याचा संकल्प पर्यावरण जागर प्रतिष्ठानने केला असून यासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पर्यावरण जागरचे नाना पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !