रावेरात उद्या दत्त जयंतीनिमित्त रथोत्सव व पालखी मिरवणूक
रावेर : दत्त जयंतीनिमित्त काढण्यात येणार्या रथ व पालखीच्या मिरवणुकीसाठी पोलिसांकडू कडेकोट बंदोबस्ताचे नियेाजन करण्यात आले आले. फैजपूर विभागातून आरसीपी प्लाटूनसह दोन अधिकारी तसेच रावेर येथील 20 पोलिस कर्मचारी, तीन अधिकारी व 49 होमगार्ड यांच्यासह एकूण चार अधिकारी व 125 कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
प्रसादाची अवहेलना न करण्याचे आवाहन
पोलिसांनी नागरीकांनाम महत्वाचे आवाहन केले आहे की, रेवडी हा दत्त महारांजाचा प्रसाद असून कुणीही घरावरून रेवडी फेकून मारू नये, प्रसादाची अवहेलना करू नये, प्रसाद देणार्याला त्याच्या हातातच द्यावा. रेवडी वरून फेकून मारल्याने किंवा फेकल्याने कोणाच्या डोळ्यावर लागून किंवा शरीराचे इतर भागावर लागून इजा होऊ शकते. दत्त रथोत्सव मिरवणुकीदरम्यान शांततेत दर्शन घ्यावे, एकदम गर्दी करू नये, स्त्रियांना प्रथम दर्शन करू देणे, गर्दी होऊन कोणाला धक्का लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे. कोणीही मोठी पुंगी कोणाचेही कानाजवळ वाजवू नये तसेच कोणताही जुगार सोरट, चक्री, गुलगुली, झन्नामन्ना खेळताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून शहरातील शांतता अबाधीत राहील यासाठी प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.



