आयजींच्या पथकाने स्फोटक जिलेटीन कांड्यांचा साठा अनेरमध्ये केला जप्त
The IG team seized a cache of explosive gelatin sticks in Aner धुळे : नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह थाळनेर पोलिस स्टेशन आणि बाँब शोध पथक, धुळे यांच्या सहकार्याने शिरपूर तालुक्यातील अनेर येथे जिलेटिन कांड्या, इलेक्ट्रिक डेटोनेटर वायर आदी 8 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. किशन गोरख भामरे (रा.अनेर, ता.शिरपूर) व स्फोटके देणारा योगेश नामक तरुण यांच्याविरुद्ध थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
विशेष पथकातील निरीक्षक बापू रोहम, एपीआय सचिन जाधव, एपीआय उमेश बोरसे, सहायक फौजदार फुलपगारे, फुलपगारे, बाँब शोध पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


