खेळाडूंनी फुललेले मैदान पाहून प्रसन्नता वाटते : प्रांताधिकारी बबनराव काकडे
यावल शहरात मेश अॅग्रो प्रायोजित स्वराज्य चषकाचे थाटात शुभारंभ, पहिल्या दिवशी रंगले पाच सामने
यावल (30 एप्रिल 2026) : एरवी मोबाईल मध्ये अडकलेली तरुणाई मैदानावर दिसत नाही मात्र शहरात प्रथमच होत असलेल्या या स्वराज चषक नाईट क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंनी भरलेले व फुललेले हे मैदान मनाला प्रसन्न करते, असे प्रतिपादन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी केले. यावल शहरातील बस स्थानकालगत मैदानावर बुधवारी सायंकाळी मोठ्या थाटात मेश अॅग्रो प्रायोजित स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाच सामने या ठिकाणी पार पडले. तर सामन्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी येथे झाली होती.
सामन्यांसाठी मोठी गर्दी
शहरातील बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या मैदानावर शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य अशी मेश ऍग्रो प्रायोजित स्वराज्य चषक नाईट क्रिकेट स्पर्धा बुधवारी सुरू झाली. शहरात प्रथमच मैदानावर स्क्रीन आणि युट्युब लाईव्ह ची सुविधा असलेली ही पहिली स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील होत्या. उद्घाटन प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन शुभारंभ प्रसंगी सुंदर अशी शिवगर्जना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची कन्या मनस्वी नाझीरकर येणे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी डीवायएसपी अनिल बडगुजर, विष्णू नाझीरकर, आमदार अमोल जावळे यांचे स्विय सहाय्यक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजी हकीम शेठ, निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, युनुस मंन्सूरी, उमर कच्छी, समीर खान सह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रांतांनी केले उद्घाटन
मैदानावर येऊन प्रांताधिकारी यांनी चेंडू टोलवून या स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचे पहिल्या दिवशी पाच सामने या ठिकाणी रंगले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सामन्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या संख्येत गर्दी होती.स्पर्धेच्या यशस्वीते करीता आयोजक शेखर पटेल, सुनील गावडे, कैलास भोईटे, रोहित सुतार, अक्षय भोईटे, रामभाऊ यादव, वेदांत सराफ सह खेळाडू परिश्रम घेत आहे.
पोलीस, राजकारणी, महसूलचे अधिकारी कर्मचारी मैदानात
या स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे व सर्व पोलीस स्टेशनच जणू मैदानावर होते. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकसंघ होऊन या स्पर्धेत पोलीस संघाशी दोन हात करताना दिसले. यामध्ये पोलिसांनी मात्र बाजी मारली तर महसूल विभाग आणि पत्रकार देखील क्रिकेट खेळताना दिसले.
