राज्य किक बॉक्सींग स्पर्धेत माया राजपूतला रौप्य पदक
भुसावळ : लातूर येथे नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्य किक बॉक्सींग स्पर्धेत भुसावळच्या सु.ग.टेमानी हायस्कूलची अकरावीची विद्यार्थिनी माया राजेंद्र राजपूतने रौप्य पदक पटकावे. औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य स्पर्धेतही तिने कांस्य पदक तर धुळ्यातील विभागीय शालेय कराटे स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. रंगभवन हॉलमध्ये माया हे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली कठीण सराव करीत आहेत. या यशाबद्दल तिचे श्रीधर शेजवळ, राकेश सपकाळे, सुमेध शेजवळ, राकेश आगरकर, सचिन बुंदेले, रीतेश मेहरा, तुषार गायकवाड, प्रदीप गायकवाड, रवी पाटणकर, रूपेश गायकवाड, रमेश साळवे, तन्वीर अहमद, मुकेश भोई, नितीन हिवरकर, मंजीत सिंग, चंदू कुलकर्णी, सिद्धार्थ मेढे, संजय सोनवणे, सुनील पाटील, राजेंद्र राजपूत यांनी माया राजपूतला शुभेच्छा दिल्या आहेत.
