यावलमध्ये 14 रोजी हिंदू राष्ट्रीय जागृती समितीची सभा


यावल : शहरातील भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिरा समोरिल मैदानावर 14 रोजी सायंकाळी 4.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती समितीची सळा होत आहे. सभेचे निमंत्रण देण्यासाठी यावल शहरासह विरावली, कोरपावली, फैजपुर, आमोदा, अंजाळे, न्हावी, चितोडे, सांगवी, भालशीव अशा अनेक गावांत निमंत्रण बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असून ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत येणार्‍या ग्रामस्थांनी केला आहे. या सभेच्या प्रचारार्थ शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स (बॅनर) लावण्यात आले आहेत, तसेच रीक्षा आणि गर्दीच्या ठिकाणी भित्तीपत्रकेही लावण्यात आली आहेत. या सभेला यावल आणि आजूबाजूच्या परीसरातील अधिकाधिक हिंदूंनी यावे आणि ही सभा यशस्वी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या धर्मप्रेमींना या सभेच्या कार्यात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी 9552426439 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !