जामनेरच्या तिघा तरुणांचा अपघाती मृत्यू


ओझरनजीक कापसाची 407 कलंडली : दबले गेल्याने तरुणांचा ओढवला मृत्यू

ओझर : नाशिकच्या कापूस व्यापार्‍याच्या गाडीवर कामासाठी असलेल्या जामनेरच्या तिघा तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता ओझर (संगमनेर) जवळ घडली. या घटनेने जामनेरात शोककळा पसरली आहे. फरमान शेख हारून (18), परवेझ शेख नासीर (19) व जुनेद शेख भिकन अशी मृत तरुणांची नावे आहेत. भरधाव कापूस वाहून नेणारी 407 कलंडल्याने या वाहनाखाली दबले गेल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.




वाहनाखाली दबल्याने मजुरांचा मृत्यू
फरमान शेख हारून, परवेझ शेख नासीर व जुनेद शेख भिकन हे तिघे तरुण गुरुवारी संगमनेर तालुक्यातील लोणीजवळील ओझर येथे एका शेतकर्‍याचा कापूस मोजण्यासाठी गेले होते. 407 वाहनात कापूस भरल्यानंतर शेतकर्‍याच्या वाड्यातून बाहेर निघाल्यानंतर काही अंतरावर गाडी कलंडल्याने कॅबीनवर बसलेले तिघे तरुण खाली फेकले गेले व वाहनाखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !