ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित दीवाळी पहाट कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध


भुसावळ : ब्राह्यण संघाच्या सभागृहात ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष सुनील पाठक, चिटणीस प्र.ह.दलाल, व्यावसायीक श्याम दरगड, मराठी मालिकेतील अभिनेता आशिष कुळकर्णी यांच्याहस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. सुरवातीला गणेशवंदना नुपूर भालेरावने सादर करीत रसिकांची दाद मिळवली. यानंतर अनेक वेगवेगळ्या गीतांवर कथक नृत्याच्या माध्यमातुन नृत्यशिक्षिका चारु भालेराव व यामिनी शिंपी, मानवी नारखेडे, वृशाली लांडगे, कनिका नेमाडे, हृदया सोनवणे, किंजल बार्हे, मेघा कुळकर्णी , नियती राणे, साक्षी कुळकर्णी, पूजा राजभर, संजीवनी कलोशे, सरीता राजभर, विभूती बर्‍हाटे, हिमांशू जावळे यांनी कथ्थकमधील विविध प्रकार सादर केले. यावेळी रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद व दाद मिळाली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शेवटी सादर झालेल्या लख-लख चंदेरी गाण्यावर सादर झालेल्या दीपनृत्याला विशेष दाद मिळाली. यावेळी ब्राह्मण संघाचे कार्यकारीणी सदस्य शंतनु गचके, अभिराम मेहेंदळे, संजय बोचरे, अमोद टेंभुर्णीकर, प्रसन्न गंधे, निलिमा नागराज, पंकज जोशी, रवींद्र फडके, घैसास उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज जोशी यांनी तर प्रास्ताविक प्र.ह.दलाल यांनी केले. सदगुरू गजानन महाराज सेवा संघाचे सदस्य सेवक संदीप माने, निलेश कनोजे, वरुण कुळकर्णी तसेच ब्राह्मण संघाचे वैभव कुळकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !