ग्राहकाला दृष्टी देण्याची जबाबदारी अ.भा.ग्राहक पंचायतीची


विकास महाजन : भुसावळात अ.भा.ग्राहक पंचायतीच्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन

भुसावळ : ग्राहकाच्या शोषणाला ग्राहक काही अंशी जबाबदार असतो त्याकरीता ग्राहकाला एक दृष्टी देण्याची जबाबदारी अ.भा.ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे प्रतिपादन शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परीषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांनी केले. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी ग्राहक व सामान्य नागरीकांना न्याय मिळण्याकरिता शासनाचे दूत म्हणून अ.भा.ग्राहक पंचायत कार्य करीत आहे. या अंतर्गत अ.भा.ग्राहक पंचायत भुसावळ तालुक्याच्या वतीने चालविण्यात येणार्‍या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा अ‍ॅड.कल्पना टेमानी होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भुसावळ संघटनेच्यावतीने तालुका संघटक व पत्रकार उज्वला बागुल, सचिव अ‍ॅड.जास्वंदी भंडारी व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केले. प्रसंगी कल्पना टेमाणी यांची नोटरीपदी नियुक्ती झाली म्हणून जिल्हा ग्राहक पंचायतीच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

शनिवारी व रविवारी खुले राहणार कार्यायल
या मार्गदर्शन केंद्राचे कार्यालय महात्मा गांधी शॉपिंग कॉम्पलेक्स, गाळा नंबर 15, दुसरा माळा जिल्हा व सत्र न्यायालया समोर, भुसावळ येथे असून प्रत्येक शनिवार व रविवारी सकाळी 10 ते 2 खुले राहणार आहे. सूत्रसंचालन सचिव अ‍ॅड.जास्वंदी भंडारी तर आभार तालुका संघटक उज्वला बागुल यांनी मानले. प्रसंगी उपाध्यक्ष राजेश सैनी, सहकोषाध्यक्ष अ‍ॅड.निलेश भंडारी, सहसचिव अ‍ॅड.रमेश पांडव, सदस्य राजेश्री नेवे, आदेश सांगडे, अनमोल टेमाणी व इतर सभासद उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !