पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी केली अटक
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोस्को कलमांतर्गत 11 जुलै 19 रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यानंतर संशयीत आरोपी सुरेश अंबादास गायकवाड (30, रा.न्यू आयएमपार्क,वाशीनाका, चेंबूर) पसार झाला होता. आरोपी घरी आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास बाजारपेठ पोलिसांनी चेंबूरमधील आरसीएफ पोलिस स्टेशनच्या सहकार्याने अटक करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.
