रेल्वे पेन्शन अदालतीत 193 तक्रारींचा निपटारा


24 लाखांच्या रकमेचे वाटप : 99 वर्षीय पेन्शनरांचा सन्मान

भुसावळ : रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींसंदर्भात सोमवारी डीआरएम कार्यालतया पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. एकूण 193 तक्रारींचा प्रसंगी निपटारा करण्यात आला. एकूण 24 लाख 29 हजार 481 रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यता आले.
भुसावळ विभागात वयाच्या 99 व्या वर्षात पदार्पण केलेले निवृत्ती वेतनधारक रामदास गणपत सैतवाल यांना मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

सर्व तक्रारींचा निपटारा
पेन्शन अदालतीचे मुख्य न्यायाधीश डीआरएम विवेक कुमार गुप्ता, तसेच अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी केले. भुसावळ पेन्शनर्स असोसिएशनचे एन.आर.सरोदे यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणा संबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच मुख्य कल्याण निरीक्षक संजय पाटील, विजय पोतदार, आर.पी.झनके, संजय इंगळे, दीपा स्वामी व इतर कल्याण निरीक्षक व कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी व दीपा स्वामी यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !