भुसावळातील डॉ.जगदीश पाटील मराठी विषयात नेट उत्तीर्ण


भुसावळ : शहरातील संतधामजवळील दुर्गा कॉलनीतील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी युजीसीमार्फत घेण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) 2022 मराठी विषयात उत्तीर्ण केली आहे.

यशानंतर शुभेच्छांचा वर्षाव
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असणार्‍या यूजीसीमार्फत एनटीएतर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा नुकतीच पार पडली. त्यात मराठी विषयाचा निकाल 5.82 टक्के लागला. या परीक्षेत संपूर्ण भारतातून मराठी विषयासाठी तीन हजार 829 विद्यार्थ्यांपैकी 223 विद्यार्थी पात्र ठरले. त्यात भुसावळ येथील डॉ.जगदीश पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी दहा वर्षांपूर्वी श्री संत एकनाथांची भक्ती या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील यूजीसी नेट परीक्षा मराठी विषयात ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील मराठी विषयाच्या प्राध्यापक पदासाठी ते पात्र ठरले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !