रावेरात पीक विम्यासाठी शेतकर्यांचे भजन आंदोलन
रावेर तालुक्यातील सर्व महसूल मंडळ पात्र : आठवडाभरात 10 हजार शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
रावेर (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील तहसील कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकर्यांतर्फे पीक विम्याच्या लाभासाठी भजन म्हणून अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रतिनिधी पवार यांनी रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळांची यादी उपस्थित शेतकर्यांना देत आठवडाभरात 10 हजार शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात येत असल्याचे आश्वासन देत ज्या शेतकर्यांचे क्षेत्र कमी दिसत असल्याच्या तक्रारी आहेत त्या 13 हजार शेतकर्यांच्या खात्यांत प्रोसेस सुरू करण्यात आल्याचे आश्वासन दिले.
या मागण्यासाठी भजन आंदोलन
केळी पीक विम्याचे पात्र महसूल मंडळ जाहीर करणे, मंजूर रक्कम खात्यात टाकणे, पीक विम्यासाठी वगळलेले क्षेत्र नियमित करणे या संदर्भात दखल घेण्यासाठी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांतर्फे गांधीजी भजन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाभरातील शेतकरी व विविध पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनास्थळी प्रभारी तहसीलदार संजय तायडे, पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, रावेर प्रतिनिधी वैभव पाटील, मनोहर पाटील, भगवान पाटील यांच्यासह अन्य अधिकार्यांनी उपस्थित राहून शेतकर्यांशी संवाद साधला.
मागण्या मान्य होताच आंदोलन थांबले
ज्या शेतकर्यांचे खात्यात पैसे पडणार नाहीत त्यांच्या त्रृटी दूर करण्यासाठी तीन कर्मचार्यांची रावेरात विमा कंपनीच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात येऊन शेतकर्यांना येणार्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वासन देण्यात आले तसेच मागण्या मान्य करण्यात आल्याने आंदोलनस्थळी शेतकर्यांनी आनंद व्यक्त करीत आंदोलन थांबविले.
यावेळी आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, सुनील कोंडे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, कृ.उ.बा. समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष वाय.एस.महाजन, धुमा तायडे, पं.स.चे माजी सदस्य दीपक पाटील, दिलरुबाब तडवी, अॅड.व्ही.पी.महाजन, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, योगेश कोळंबे, विवेक बोंडे, डिगंबर नेहेते, गोपाळ भिरुड, विष्णू भिरुड, शिवराम पाटील, अतुल पाटील, सुनील बर्हाटे, हेमराज पवार, संदीप भिरुड, मधुकर पाटील, शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील, राहुल पाटील, प्रशांत नेमाडे, मोहन बोंडे, सतीश पाटील, चंद्रकांत चौधरी याच्यासह तालुकाभरातून शेतकरी बांधव उपस्थित होते.


