भाजपा अनुसूचित जाती नूतन कार्यकारीणी जाहीर
सरचिटणीसपदी संतोष ठोकळ तर उपाध्यक्षपदी विक्कीर गोहर
BJP Scheduled Castes New Executive Announced भुसावळ : भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहरातील कार्यकारीणी सदस्यांची निवड आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. याप्रसंगी नूतन पदाधिकार्यांना भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांच्याहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
नूतन कार्यकारीणी अशी
भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. त्यात सरचिटणीस- संतोष बळवंत ठोकळ, उपाध्यक्ष- विक्की राजेश गोहर, चिटणीस- भरत गोपाल उमरिया, चिटणीस- दिनेश पन्नालाल बालूरे, चिटणीस- शंकर प्रकाश कांबळे चिटणीस- राज भीमा आठवले
चिटणीस- मुकेश महादू कांबळे. दरम्यान, नुतन कार्यकारणी सदस्यांनी येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करण्याचा व त्याच प्रमाणे पक्ष संघटन मजबुत करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कार्यकारीणी सदस्यांचे
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर आदींनी अभिनंदन केले आहे.

