आमदार चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांना स्थगिती देण्यापेक्षा दुपटीने निधी आणावा : आमदार एकनाथराव खडसे यांचा टोला


MLA Chandrakant Patil should bring double funds instead of suspending development Works : MLA Eknathrao Khadse’s Group मुक्ताईनगर :  गेले तीस वर्ष मतदारांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली व तीस वर्षात सर्व जाती-धर्मातील लोकांना घेवून सर्वसमावेशक विकासाचे राजकारण केले, विकास कामे करताना कुठलाही भेदभाव केला नाही मात्र आताचे आमदार विकासकामांना स्थगिती देतात स्थगिती देण्यापेक्षा, आम्ही आणलेल्या विकास निधी पेक्षा दुपटीने विकास निधी आणा, स्थगिती देण्यापेक्षा विकास कामांची स्पर्धा करा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते म्हणाले की, राजकारण करताना कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आजकालचे राजकारण बदलले आहे सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत करीत आहेत म्हणून मुक्ताईनगरात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होऊ देण्यात आली नाही, असा दावा खडसे यांनी हरताळ येथे केला.

जनसंवाद यात्रेदरम्यान साधला संवाद
मुक्ताईनगरात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या 32 व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द हरताळा येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद सभा झाली.



विकासकामे करण्यासाठी कटीबद्ध
यावेळी खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरात होणारी सभा होवू देण्यात आली. विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. मतदारसंघात अनेक विकासकामे केली. राहिलेली विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यामुळे आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पवन पाटील, विलास धायडे, प्रदीप साळुंखे, समाधान कार्ले, रामभाऊ पाटील, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !