पनवेल-छपरा एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ
भुसावळ : प्रवाशांची रेल्वे गाड्यांना होणारी अतिरीक्त गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाकडून पनवेल-छपरा या विशेष गाडीच्या चालविण्याचा कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
असे आहे गाडीचे वेळापत्रक
05194 विशेष गाडी 16 नोव्हेंबर 2022 या दिवशी रात्री 10.50 वाजता पनवेल येथून सुटेल आणि छपरा येथे तिसर्या दिवशी सकाळी 8.50 वाजता पोहोचेल तसेच छपरा येथून ही गाडी मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 या दिवशी दुपारी 3.20 वाजता छपरा येथून सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पनवेलला रात्री 9 वाजता पोहोचणार आहे.

