भरधाव आयशरने दुचाकीला उडवले : जळगावातील विवाहिता ठार, पती गंभीर जखमी
Speeding Eicher blew up the bike : Jalgaon married woman killed, husband seriously injured धरणगाव : दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने उडवल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना पिंप्री गावाजवळील भोद फाट्याजवळ बुधवार, 9 रोजी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात शनिवार, 12 रोजी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नीचा जागीच मृत्यू
जळगाव शहरातील पारेख नगरातील रहिवासी महादू शिवाजी चव्हाण (47) हे पत्नी रोशनीसह बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.ई.9502) ने जळगाव येथून अमळनेरला जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंप्री गावाच्या पुढे भोद फाट्याजवळ भरधाव आयशर (एम.एच.19 सी.वाय.2501) ने धडक दिल्याने रोशनी चव्हाण यांच्या डोक्यास, पायास, पोटास, गंभीर दुखापत झाली तर महादू चव्हाण यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ मार लागला. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला होता तर मालवाहू रीक्षाद्वारे जखमी रोशनी चव्हाण यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी महादू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आयसर (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.2501) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार खुशाल पाटील करीत आहेत.

