जळगावातील पाणीपुरी विक्रेत्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी : तरुणाविरोधात गुन्हा


Panipuri Seller In Jalgaon demands Physical Comfort : Crime Against Youth जळगाव : पाणीपुरी विक्री करणार्‍या 48 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवार, 13 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला सईद खाटीक (पूर्ण नाव माहित नाही) या संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग
संशशीत सईद खाटीक या इसमाचे चिकन विक्रीचे दुकान असून त्याने 48 वर्षीय पीडीत महिलेला आपल्या दुकानावर बोलावत तुझ्याकडे सेटींग लावायची आहे. ‘कुछ भी करके मेरी सेटींग लगानी पडेगी’, असे म्हणत त्याने पीडीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दिल्यानंतर सईद खाटीक याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !