भुसावळातील रामचंद्र ढाके यांना सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार जाहीर
भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील हनुमान नगरातील श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पांडुरंग ढाके (85) यांना पुण्यातील डॉ.मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार व निती आयोग संलग्नीत दिल्ली यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा दिला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला. याबातचे पत्र ढाके यांना आरोग्य सेवा केंद्र उरुळी कांचन, पुण्याचे डॉ.रवींद्र भोळेद्वारा नुकतेच प्राप्त झाले.
सेवा कार्याची दखल
ढाके यांनी गेल्या 45 वर्षापासून हनुमान नगर भुसावळ परिसरात हनुमान मंदिर व श्रीराम मंदिर संस्थानच्या माध्यमातून वारकरी भजनी मंडळ, हरिनामसप्ताह, विविध धार्मिक ग्रंथाची पारायणे, किर्तन, प्रवचन, निरुपण या सारख्या कार्यक्रमात नियमित सातत्य ठेवले आहे. केलेल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक सेवा कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने ढाके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



