जळगावात व्यावसायिकाकडे भर दिवसा दरोड्याचा प्रयत्न फसला


जळगाव : जिल्ह्यातील नामांकीत वाहन व्यावसायीक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोडेखोरांनी लूटीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने रहिवासी जमा झाल्याने दरोडेखोरांना पळ काढावा लागला मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पाळत ठेवून दरोड्याचा प्रयत्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे परीवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. बच्छाव हे लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेले असताना मोठा मुलगा किरण बच्छाव हे शोरूमला होते तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला.



नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. योगायोगाने काही मिनिटात किरण बच्छावदेखील घरी पोहोचले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत ? अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.

नागरिक जमताच दरोडेखोर पळाले
बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी मागील बाजूने पळ काढला. दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी दोघांकडे नकली पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह अधीक्षक गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस पोहचले आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि बच्छाव कुटुंबियांचे मित्र मंडळी देखील त्यांची भेट घेत विचारणा करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !